नव्या संकल्पांची नांदी
नव्या संकल्पांची नांदी
माझ्या संस्कारात रुजलेली
नव्या कल्पनांची चित्रे
मनःपटलावर उमटलेली.
आपसूक घडण्याची कला
निसर्गालाच खरी कळली
या पामराजवळ मात्र
दोन हातांची संपत्ती भली.
घडणाऱ्या ह्या घड्यावर
आशांची नक्षी काढलेली
संकल्पांना प्रत्यक्षात आणण्या
प्रयत्नांची कास धरलेली.
© Archana Patil-Harankhedkar
माझ्या संस्कारात रुजलेली
नव्या कल्पनांची चित्रे
मनःपटलावर उमटलेली.
आपसूक घडण्याची कला
निसर्गालाच खरी कळली
या पामराजवळ मात्र
दोन हातांची संपत्ती भली.
घडणाऱ्या ह्या घड्यावर
आशांची नक्षी काढलेली
संकल्पांना प्रत्यक्षात आणण्या
प्रयत्नांची कास धरलेली.
© Archana Patil-Harankhedkar

0 Comments:
Post a Comment
<< Home