Wednesday, August 30, 2006

सौंदर्याचे मोती

संथसावळ्या पाण्यावर
तरंगांची सुबक नक्षी
भोवरे गरगर फेर धरती
नाचत छंदे जलाशयी पक्षी.

भोवऱ्यांची रुपेरी वर्दळ
तरंगांचा दाटे गोंधळ
चिमुकलिशी लाटही तिथे
गाजवित येते वेगे खळखळ.

पाण्यावरची वाट माझी
अडवित येते सृष्टी चंचल
अलिकडे अन पलिकडे हिरव्या
प्रतिबिंबांचा खेळ अविरत.

क्षणभर मनाचे फुलपाखरू
विसावले ह्या कल्पनेवरही
तळ्याच्या अंतरामधी किती
दडवले सौंदर्याचे मोती.


दृष्टीसुख उपभोगण्या
निसर्गाने उघडले द्वार
मानवलोचना असावे तत्पर
अनुभवण्या आनंद अपार.

© Archana Patil-Harankhedkar

0 Comments:

Post a Comment

<< Home