Wednesday, August 30, 2006

पहिला पाऊस

क्षितिजावरती घडून मिलन
चोहीकडे निःशब्द तरंग

इंद्रधनूच्या तेजस्वी बाणांनी
उधळले आसमंती सप्तरंग

नित्याप्रमाणे ह्याही वेळी
जलवर्षावाने भिजली भूमी

पहिल्याच पावसाने तृप्त होऊन
बाल वनश्रीस जन्म घाली

© Archana Patil-Harankhedkar

3 Comments:

Blogger Shailesh S. Khandekar said...

अर्चना,

आपले मराठी अनुदिनी विश्वात स्वागत असो. पहिला पाऊस, सौंदर्याचे मोती आणि एक आठवण ह्या तीनही कविता फारच सुरेख आहेत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

सहजच एक आठवण जागी झाली
बालपणीच्या पिंपळाखाली
अशीच किलबिल जागत होती
सकाळच्या गुलाबी पांघरुणाभवती

...
क्षणभर मनाचे फुलपाखरू
विसावले ह्या कल्पनेवरही
तळ्याच्या अंतरामधी किती
दडवले सौंदर्याचे मोती.

...
इंद्रधनूच्या तेजस्वी बाणांनी
उधळले आसमंती सप्तरंग


ही कडवी विशेष आवडली!

3:38 AM  
Blogger Archana Patil-Harankhedkar said...

धन्यवाद शैलेश!

5:52 AM  
Blogger Archana Patil-Harankhedkar said...

This post has been removed by a blog administrator.

6:07 AM  

Post a Comment

<< Home