एक आठवण
हिरव्या हिरव्या रानामधली
गोड कूजने कानी पडली
मना अवचित हरखून गेली
गे कोकिळा तू काय बोलली?
तुझे गायन कानी पडता
चिरपरिचित वाटत असता
ह्या शांत सळसळीचा
अभिन्न अंग झाले जाणवता
सहजच एक आठवण जागी झाली
बालपणीच्या पिंपळाखाली
अशीच किलबिल जागत होती
सकाळच्या गुलाबी पांघरुणाभवती
कर्णमधुर ती नसली जरिही
त्या वेळी अन त्या काळी
कोवळेल्या त्या कळीशी
नकळत तिची मैत्री झाली
दुधाळ चांदण्यांच्या फुलांमागून
ह्या ध्वनिचा गंध उधळला
स्वप्नांमधेही प्रकाशासवे
नादभऱ्या उषेचा छंद उगवला
झुळुकिसवे झुलणाऱ्या
गे कोकिळे त्या कळीसारखी
एक आठवण तुझ्या कूजने
माझ्या मनात जागती झाली
© Archana Patil-Harankhedkar
गोड कूजने कानी पडली
मना अवचित हरखून गेली
गे कोकिळा तू काय बोलली?
तुझे गायन कानी पडता
चिरपरिचित वाटत असता
ह्या शांत सळसळीचा
अभिन्न अंग झाले जाणवता
सहजच एक आठवण जागी झाली
बालपणीच्या पिंपळाखाली
अशीच किलबिल जागत होती
सकाळच्या गुलाबी पांघरुणाभवती
कर्णमधुर ती नसली जरिही
त्या वेळी अन त्या काळी
कोवळेल्या त्या कळीशी
नकळत तिची मैत्री झाली
दुधाळ चांदण्यांच्या फुलांमागून
ह्या ध्वनिचा गंध उधळला
स्वप्नांमधेही प्रकाशासवे
नादभऱ्या उषेचा छंद उगवला
झुळुकिसवे झुलणाऱ्या
गे कोकिळे त्या कळीसारखी
एक आठवण तुझ्या कूजने
माझ्या मनात जागती झाली
© Archana Patil-Harankhedkar

4 Comments:
छान आहे कविता.
तुझ्या नविन blog साठी शुभेच्छा!
छान आहे...
नवीन ब्लॉग साठी शुभेच्छा!!
मराठी ब्लॉगविश्वात स्वागत, शुभेच्छा!
कविता छान आहे, लिहीत रहा!
मिलिंद,माझाब्लॉग आणि सुमेधा,
तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
Post a Comment
<< Home