माझ्या प्रवासास
पायांनी तुडवीत जातांना
रानांची हिरवळ गार
अंगावर झेलत जाताना
भूमी , जल असो वा आकाश
मार्गांची पर्वा नसताना
अवकाशातल्या उड्डाणांनी
पृथ्वीला गवसणी घालताना
मनाच्या खोल खोल तळात
मत्स्यापरी सुळकांडी मारताना
अन कल्पनेच्या पंखांनी
ज्ञानाचा वेध घेताना
'स्व'चा अविरत शोध होतसे
माझ्या प्रवासास चालना
थांबणे नलगे तिथवर जिथे
बदलतात मर्यादांच्या संकल्पना.
© Archana Patil-Harankhedkar
